SUPER SATURDAY
                                                                      Students Activity Day..
या उपक्रमांतर्गत काल दि 27 ऑगस्ट 2022 रोजी इयत्ता 8वी वर्गाचा ॲक्टिविटी डे होता यामध्ये सर्वप्रथम 8 वी अ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर इंग्रजी मध्ये परिपाठ सादर केला. यासाठी त्यांच्या वर्गशिक्षिका भूमिका शाह यांनी त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्राथमिक शाळेचे शिक्षक, योगगुरु श्री कोलपेवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे, ध्यान एकत्रित करण्याचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेले विविध कलागुण जसे डान्स,संगीत तबला, गिटार,भाषण, संभाषण, जिम्नास्टिक आदी अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांसमोर सादर केले. मध्यंतरानंतर नांदेड चे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर संदीप देशपांडे व त्यांचे सहकारी डॉ बालाजी भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच त्यानी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुमठाणकर सर, उपमुख्यापिका शहा टिचर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा देशमुख मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले व त्यांचे प्रोत्साहन वाढवले. तसेच आठवीच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.. व श्री बालाजी सर व श्री पवार सर यांनी कार्यक्रमाचे विशेष क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले..????????

                                                    super saturday  watch on facebook https://fb.watch/fb3k-XwYLk/

                              for more updates pls follow on facebook  page https://www.facebook.com/profile.php?id=100071844513956