गुजराती प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत
गुजराती प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग प्रतिबंधक नियमावली चे पालन करून पहिली ते चौथी चे वर्ग सुरू करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सापडगावकर सर यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तब्बल वीस महिन्यांनी शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अगदी आनंदात होते. आपल्या जुन्या मित्रांमध्ये ते रममाण झाले. यावेळी विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल पाहून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.