WhatsApp Image 2025-02-24 at 10-22-24_c1863c28

 

 

 

गुजराती हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात संपन्न !


              दि.26 जाने 2025 रोजी गुजराती हायस्कूल, नांदेड मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाच्या उगवत्या सूर्यास वंदन करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची हनुमान पेठ परिसरात प्रभातफेरी संपन्न झाली. ठिक 8:05 वाजता गुजराती शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. केतनभाई नागडा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दीपक भाई दामा, कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल, कार्यकारणी सदस्य सर्वश्री राजेशभाई सुरतवाला, जयंतीलालभाई पटेल, मुकेशभाई पटेल, दीपेशभाई शाह, भावेशभाई नागडा, अश्विनभाई पटेल, अतुलभाई लोटिया, जयेशभाई हरिरामभाई ठक्कर, योगेशभाई पटेल, लक्ष्मीकांतभाई गणात्रा, प्रेमजीभाई गौरी, तसेच श्री मोहनभाई भद्रा, श्री वसंतभाई भानुशाली, श्री चेतनभाई चव्हाण, श्री राजेशभाई दावडा, श्री अभिजीतभाई सोमय्या व इतर गुजराती समाजातील सन्माननिय सदस्य, गुजराती हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र सुमठाणकर, उप-मु.अ.सौ मेघा जोशी, गुजराती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दुर्गादास सापडगावकर, भानुमती वर्मा बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ दीप्ती पटेल आणि गुजराती इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री कौशल दुबे तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य हे उपस्थित होते.

              संपूर्ण गुजराती शाळेच्या चारही शाखांचे युनिफॉर्म चे GHS या इंग्रजी अक्षरात अतिशय उत्तम सादरीकरण झाले. यावेळी 'इन्क्रीडीबल इंडिया' ही थीम घेऊन गुजराती हायस्कूल विद्यार्थीनी भारतातील सर्व प्रांतातील, राज्यातील पोशाख (पेहराव) परिधान करून सर्वोत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केला. तसेच गुजराती प्राथमिक शाळेने देशभक्तीपर गीत सादर केले. गुजराती इंग्लिश मिडियम स्कूल ने देशभक्तीपर नृत्य सादर केले. तर भानुमती वर्मा बालक मंदिरच्या चिमुकल्यानी भारतीय सण उत्सव परंपरा यांचे सादरीकरण अतिशय सुंदर केले. यावेळी गुजराती हायस्कूलच्या शिक्षक पालक संघातर्फे उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन सौ.भूमिका शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रामेश्वर ब्याळे यांनी केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन मु.अ. श्री सुमठाणकर, उप. मु.अ. सौ. मेघा जोशी, सहा. पर्यवेक्षक श्री. हुलकाने यांनी केले होते. तर सांस्कृतिक विभागाचे सौ. वैशाली अंम्बाडे, सौ.पल्लवी वैद्य व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांनी परिश्रम घेतले.