गुजराती हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन संपन्न
नांदेड. (दि. 17.09.2021)
गुजराती हायस्कूल मध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न झाला. आजच्या या शुभ दिनी ठीक 8.05 वाजता गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केतनभाई नागडा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी गुजराती शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल कार्यकारणी सदस्य श्री जितेंद्रभाई चौव्हाण, श्री भावेशभाई नागडा, श्री दिपेशभाई शाह, श्री दिपकभाई ठक्कर, श्री राकेशभाई शाह, श्री राजेशभाई सुरतवाला हे उपस्थित होते. तसेच गुजराती हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री रविंद्र सुमठाणकर, उपमुख्याध्यापिका सौ. एन.जे. शाह, पर्यवेक्षक श्री एस.के.नायक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.डी.सापडगांवकर भानूमती वर्मा बालकमंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ. वैशाली अंबाडे यांनी केले तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संपूर्ण इतिहास सौ सुखदा नवशिंदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सर्वासमोर उभा केला.
कोवीडच्या सर्व नियमांचे पालन करुन कार्यक्रम शिस्तबध्द रीतीने पार पाडला.