गुजराती हायस्कूल मध्ये गुणवंतांचा सत्कार संपन्न

 

शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2021 मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्याचा सत्कार समारंभ गुजराती हायस्कूल मध्ये आयोजीत करण्यांत आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकभाई दामा होते तर मंचावर विदयार्थ्याचे कौतुक करण्यांसाठी गुजराती शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल कार्यकारणी सदस्य श्री भावेशभाई नागडा, श्री शंकरलालभाई पटेल, श्री गिरीशभाई ठक्कर श्री भावेशभाई नागडा उपस्थित होते.

'कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व शारदा पुजन झाले. या वेळी शाळेतून गुणानुक्रमे प्रथम देशमुख भार्गवी शशीकांत व गांधी सिया राहुल यांनी 499/600(499/500) Best of Fiveगुण प्राप्त केले, गुणानुक्रमे द्वितीय पारसेवार आनंद यांनी 495/600(495/500)Best of Five गुण प्राप्त केले तर गरुडकर स्नेहा विजय व भारोटे प्रिया संदीपकुमार 494/600 (494/500) Best of Fiveगुण प्राप्त केले हे मानकरी ठरले आहेत. गुजराती शिक्षण संस्थे तर्फे विविध शिष्यवृत्तीचे वितरण करण्यांत आले.

गुणानुक्रमे प्रथम तीन आणि 90% च्या वर 79 होते. त्या सर्वानी गुजराती शिक्षण संस्थेतर्फे आणि विविध शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यांत आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र सुमठाणकर, उपमुख्याध्यापक सौ. एन.जे. शाह, पर्यवेक्षक श्री एस. के. नायक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ. विभा थापे यांनी केले.