गुजराती शिक्षण संस्थेत निरोप समारंभ
नांदेड येथील गुजराती शिक्षण संस्था संचलित भानुमती वर्मा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती सावित्रीबेन चव्हाण सहशिक्षीका श्रीमती रेखाबेन शाह, सौ.निताबेन शाह श्रीमती प्रविणाबेन पटेल तसेच गुजराती हायस्कूल च्या गणित विषय शिक्षीका श्रीमती सरोजिनी पट्टावार हे सर्व शासन नियमानुसार सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने आयोजीत निरोप समारंभात गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केतनभाई नागडा हे अध्यक्षस्थानी होते तसेच या निमित्त उपाध्यक्ष श्री शंभूभाई मंगे व श्री भगवानभाई पटेल सचिव श्री दिपकभाई दामा सहसचिव श्री लक्ष्मीकांतभाई गणात्रा सदस्य श्री जितेंद्रभाई चौव्हाण श्री दिपेशभाई शाह श्री भावेशभाई नागडा यांची विशेष उपस्थिती होती.
गुजराती शिक्षण संस्था, गुजराती हायस्कूल, गुजराती प्राथमिक शाळा तसेच भानूमती वर्मा बालक मंदिर यांच्या तर्फे शाल, श्रीफळ, भेटवस्तु, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कारमुतीचा भव्य सत्कार करण्यांत आला. या वेळी गुजराती शिक्षण संस्थेत 45 वर्ष अविरत सेवा करणा-यां श्रीमती सावित्रीबेन चव्हाण तसेच सहशिक्षीका श्रीमती रेखाबेन शाह, सौ निताबेन शाह श्रीमती प्रविणाबेन पटेल श्रीमती सरोजिनी पट्टावार या सर्व सहशिक्षकांच्या कार्याचा परिचय देऊन त्यांना संस्थे तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यांत आले. या प्रसंगी गुजराती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री शंभूभाई मंगे व सचिव श्री दिपकभाई दामा यांनी सत्कारमूर्ती बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यांसाठी गुजराती हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री रविद्र सुमठाणकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दुर्गादास सापडगांवकर गुजराती हायस्कूल चे पर्यवेक्षक श्री संजय नायक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. दिप्ती पटेल, सौ. विभा थापे, सौ. वैशाली आयचित यांनी केले तर आभार प्रदर्शन सो विभा थापे यांनी केले. या नंतर गुजराती शिक्षण संस्थे तर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.