गुजराती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न
नांदेड, दि. ८ : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या सुचनेनुसार गुजराती शिक्षण संस्था व मुख्याध्यापक गुजराती हायस्कूल यांच्या मार्गदर्शनखाली १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड- १९ लसीकरण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड वाघाळा महानगरपालिकांचे स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सतत्तार, सभागृह नेता कनकदंडे, आयुक्त सुनिल लहाने, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू, गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव दीपकभाई दामा, सदस्य राजेशभाई सुरतवाला, राकेशभाई शाह, भावेशभाई नागडा, योगेशभाई पटेल तसेच गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक रविंद्र सुमठाणकर, उपमुख्याध्यापिका सौ. एन. जे.शाह, पर्यवेक्षक एस. के. नायक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुर्गादास सापडगावकर, भानुमती वर्मा बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती पटेल, सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून शिस्तीत पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी शासनाचे सर्व नियम पाळून लसीकरण मोहिम यशस्वी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य समितीचे श्री कोनाळे सर व श्री वाघमारे सर यांचे सहकार्य लाभले.
मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या