गुजराती हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्व आहे. भारताचे दूसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ १९६२ पासून शिक्षक दिन साजरा केला जातो .
दि. ६ सप्टेंबर रोजी गुजराती हायस्कूलमध्ये शिक्षक दिन' प्रतिमापूजन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. दीपकभाई दामा यांचे हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. विभा थापे यांनी केले. त्यानंतर शाळेतील शिक्षकवृंदांचा मा. सचिव श्री. दीपकभाई दामा, मा. मुख्याध्यापक श्री. आर. एस. सुमठाणकर सर, उप. मु.अ. मा. सौ. एन. जे. शहा मॅडम, पर्यवेक्षक मा. एस. के. नायक सर, यांचे हस्ते लेखनकीट सप्रेम भेट देण्यात आले.
शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सेवकवर्गाला यावेळी मोफत वह्या वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाला मा. गुजराती शिक्षण संस्थेच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.