गुजराती हायस्कूल मध्ये 75 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा
गुजराती हायस्कूल मध्ये 75 वा स्वातंत्र दिन उत्साहात संपन्न झाला. ठीक 8.05 वाजता गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केतनभाई नागडा यांचो शुभहस्ते ध्वजारोहण करण्यांत आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री शंभूभाई मंगे व श्री भगवानभाई पटेल सचिव श्री दिपकभाई दामा सहसचिव श्री लक्ष्मीकांतभाई गणात्रा, कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल, कार्यकारणी सदस्य सर्वश्री जितेंद्रभाई चौव्हाण, श्री भावेशभाई नागडा, श्री गिरीशभाई ठक्कर राकेशभाई शाह राजेशभाई सुरतवाला माधवजीभाई भानुशाली, चंद्रकांतभाई पटेल तसेच गुजराती समाजातील सर्वश्री विश्रामभाई गोरी व वसंतभाई भानूशाली मुख्याध्यापक श्री रविंद्र सुमठाणकर, उपमुख्याध्यापिका सो. एन.जे. शाह पर्यवेक्षक श्री एस. के. नायक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री डी. डी. सापडगांवकर, भानूमती वर्मा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती पटेल, सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांची 100% उपस्थिती होती. Covid च्या सर्व नियमाचं पालन करुन स्वातंत्र दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी देशाची 75 वर्षाची अमृतमय वाटचाल यावर सौ. विभा थापे यांनी आपले विचार व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा योग साधून गुजराती शिक्षण संस्थेचे संकेतस्थळ www.gujratishikshansanstha.in याचे अनावरण करण्यांत आले.