सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी सुरू
नांदेड शहरातील मध्यवर्ती वजिराबाद या भागांमध्ये गुजराती शिक्षण संस्थेच्या सुसज्ज इमारतीत चालणारी गुजराती प्राथमिक शाळा शालेय विद्यार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर असते. या अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत देय असलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटप करण्याची प्रक्रिया शाळेत सुरू आहे.
यापूर्वीच मागील वर्षीचे विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले पाठ्यपुस्तके शाळेने सर्व मुलांना वितरित करून मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही,याबाबत पूर्व खबरदारी घेतली होती. दरम्यान शासनाकडून नव्याने प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना तात्काळ वितरित करण्याचे कार्य शाळेत सुरू आहे .