Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

sanvidhan din

 

 गुजराती शाळेत संविधान दिवस साजरा  - २६/११च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली -

                             संविधान किंवा राज्यघटना हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे.  संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान समजले जाते. सरकारने २०१५ साली प्रथमच 'संविधान दिन साजरा केला. आज गुजराती हायस्कूलमध्ये या दिनानिमित्ताने संविधानाची माहीती व वाचन घेण्यात आले.

               २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मौनाओरे श्रद्धांजली वाहण्यात आली.  याप्रसंगी गुजराती हायस्कूलचे मु.अ.आर.एस. सुमठाणकर सर, प्राथमिक शाळेचे मु.अ. मा. श्री. डी.डी. सापडगावकर सर, उप मु. अ. सौ. एन.जे. शहा मॅडम, बालकमंदीरचे शिक्षकवृंद, पर्यवेक्षक मा.श्री. एस. के. नायक सर प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, हायस्कूलचे शिक्षकगण उपस्थित होते.