Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

sanman narishakticha jagar navdurgecha

गुजराती प्राथमिक शाळेत झाला सन्मान नारीशक्तीचा..!
नवरात्रमहोत्सव - 2022 चे औचित्य साधुन गुजराती शिक्षण संस्था संचलित गुजराती प्राथमिक शाळेत
"सन्मान नारीशक्तीचा- जागर नवदुर्गेचा' हा सांस्कृतिक सन्मान सोहळा गुरुवार दि 29-09-2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी देवीचा गोंधळ व गरबा लोकनृत्य सादर केले. या निमित्ताने नांदेड शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यावेळी (1) अप्पर जिल्हाधिकारी मा.सौ दिपाली मोतीयळे (कुलकर्णी) - प्रशासकीय क्षेत्र (2) शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ सौ. सविता बिरगे -शिक्षणक्षेत्र (3) नगरसेविका मा. सौ. वैशाली देशमुख - राजकीय क्षेत्र (5) ॲडव्होकेट प्रा.सौ.दिपा बियाणी - वकील 6)डॉ. सौ. अर्चना बजाज - वैदयकीय क्षेत्र/समाजकार्य 6) उद्योजिका सौ सविता आईलवाड (उद्योगक्षेत्र) आदी उच्चपदस्थ नारीशक्तीनी उपस्थित राहुन सम्मान स्विकारला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री केतनभाई नागडा, सचिव मा. श्री दिपकभाई दामा उपाध्यक्ष मा. श्री चंद्रकांतभाई पटेल, कोषाध्यक्ष मा. श्री शांतीलालभाई पटेल व सर्व सन्माननीय सदस्य सपत्नीक उपस्थित होते. या निमित्ताने संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी सभासदांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मु.अ. श्री. सापडगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम सुत्रसंचालन सौ. प्रिती देशपाडे, आभार प्रदर्शन सौ वर्षा लाटकर यांनी केले. सचिव श्री दिपकभाई दामा यांनी संस्थेच्या वतीने अध्यक्षीय समारोप करून कार्यक्रमाची
सांगता झाली.
कार्यक्रमाची लिंक - https://youtu.be/jszztf0oTAE
 
कदाचित ८ लोक, लोकं उभी आहेत आणि आंतरिक ची इमेज असू शकते
 
 
                                                                          गुजराती प्राथमिक शाळेत झाला सन्मान नारीशक्तीचा..!
नवरात्रमहोत्सव - 2022 चे औचित्य साधुन गुजराती शिक्षण संस्था संचलित गुजराती प्राथमिक शाळेत"सन्मान नारीशक्तीचा- जागर नवदुर्गेचा' हा सांस्कृतिक सन्मान सोहळा गुरुवार दि 29-09-2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी देवीचा गोंधळ व गरबा लोकनृत्य सादर केले. या निमित्ताने नांदेड शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यावेळी (1) अप्पर जिल्हाधिकारी मा.सौ दिपाली मोतीयळे (कुलकर्णी) - प्रशासकीय क्षेत्र (2) शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ सौ. सविता बिरगे -शिक्षणक्षेत्र (3) नगरसेविका मा. सौ. वैशाली देशमुख - राजकीय क्षेत्र (5) ॲडव्होकेट प्रा.सौ.दिपा बियाणी - वकील 6)डॉ. सौ. अर्चना बजाज - वैदयकीय क्षेत्र/समाजकार्य 6) उद्योजिका सौ सविता आईलवाड (उद्योगक्षेत्र) आदी उच्चपदस्थ नारीशक्तीनी उपस्थित राहुन सम्मान स्विकारला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री केतनभाई नागडा, सचिव मा. श्री दिपकभाई दामा उपाध्यक्ष मा. श्री चंद्रकांतभाई पटेल, कोषाध्यक्ष मा. श्री शांतीलालभाई पटेल व सर्व सन्माननीय सदस्य सपत्नीक उपस्थित होते. या निमित्ताने संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी सभासदांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मु.अ. श्री. सापडगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम सुत्रसंचालन सौ. प्रिती देशपाडे, आभार प्रदर्शन सौ वर्षा लाटकर यांनी केले. सचिव श्री दिपकभाई दामा यांनी संस्थेच्या वतीने अध्यक्षीय समारोप करून कार्यक्रमाचीसांगता झाली.