विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांचे धडे मिळावेत या उद्देशाने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदतर्फ दरवर्षी आयोजन केले जाते. सदरील परीक्षेत जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये प्रति वर्ष बक्षीस म्हणून दिले जाते. आपल्या शाळेत दरवर्षी पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेस बसतात. तसेच त्यांना शाळेत दर शनिवारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून माझ्याकडे इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा विभाग आहे.
- शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये 256 परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आणि त्यातील जिल्हास्तरावर 0८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत.
- शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये 190 परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 67 विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरले तर तब्बल 16 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
- शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 217 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहेत त्यापैकी 06 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले.
- शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 210 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थी शिष्यवृत्ती सो पात्र झाली आणि त्यातील 03 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत.
आठवी स्कॉलरशिप परीक्षा
- शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 180 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र सहा विद्यार्थी जिल्हा यादीत झळकले.
- शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 187 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आणि 13 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये झळकले.
इयत्ता पाचवी मधील कुमारी भार्गवी शशिकांत देशमुख आणि चिरंजीव सोहम अमोल विभुते हे दोन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी मध्ये चमकले तर इयत्ता आठवी मधून कुमारी श्वेता खंदारे ही विद्यार्थिनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चमकले.
श्री सावंत ए. व्ही.
विभाग प्रमुख
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विभाग गुजराती हायस्कूल