Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

har ghar tiranga

देशाच्या स्वातंत्र्य महोत्सव निमित्ताने गुजराती हायस्कूलने केले भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

घर घर तिरंगा हा नारा घरोघरी पोहोचविण्यांसाठी आणि देशाच्या 75 व्या वर्षाच्या अमृत महोत्सव निमित्त गुजराती हायस्कूल परिवाराने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. ड्रोन द्वारे या उद्घाटनाचे चित्रिकरण करण्यांत आले.

                           या भव्य आणि अभुतपुर्व रॅलीची सुरुवात गुजराती हायस्कूल मध्ये झाली. रॅलीचे उद्घाटन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड सौ. वर्षा ठाकुर घुगे यांच्या शुभहस्ते करण्यांत आले. या प्रसंगी मा. शिक्षणाधिकारी (मा.) श्री प्रशांत दिग्रसकर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाचे शिक्षणाधिकारी श्री राजेश पाताळे, उपशिक्षणाधिकारी (मा.) श्री माधव सलगर व शिक्षण विस्तार अधिकारी श्री परमेश्वर गोणारे तसेच गुजराती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांतभाई पटेल व श्री शंभूभाई मंगे, सचिव श्री दिपकभाई दामा, कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल, कार्यकारणी सदस्य सर्वश्री जयंतीलालभाई पटेल, मुकेशभाई पटेल, राकेशभाई शाह, दिपेशभाई शहा, भावेशभाई नागडा, अश्विनभाई पटेल, जयेशभाई ठक्कर माधवजीभाई गजरा, योगेशभाई पटेल, किर्तीभाई छेडा, प्रेमजीभाई गोरी तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दुर्गादास सापडगांवकर, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती पटेल (दावडा) व इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री दुबे सर यांची विशेष उपस्थिती होती.

या रॅलीत सर्वात प्रथम भारतमाता, तिरंगा गणवेशात लेझीम पथक, एन.एस.सी.चे कॅडेट्स आणि यानंतर 300 मीटर लांबीचे भव्य तिरंगा विदयार्थ्यांनी आपल्या माथ्यावर धारण केले. तसेच रॅलीमध्ये सहभागी 500 विदयार्थ्याच्या हातात तिरंगा लहरत होता आणि माझा तिरंगा - माझी शान देश माझा महान घरघर तिरंगा अशा घोषणा देत सर्व विदयार्थ्यांनी नांदेडवासीयांचे लक्ष वेधले होते. या विदयार्थ्यांनी तिरंगा फडकविण्यांसाठी जनतेला आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात 75 या अंकाचे शिस्तीत आणि अभूतपूर्व प्रदर्शन केले होते, ते सर्व मान्यवरांना खुप आवडले आणि परिसरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सुरेख नियोजन मुख्याध्यापक श्री रविंद्र सुमठाणकर यांनी केले तर उपमुख्याध्यापिका सी.एन.जे. शाह, पर्यवेक्षक श्री एस. के. नायक यांनी त्यांना सहकार्य केले या कल्पक रॅलीचे आयोजनासाठी शाळेचे कलाशिक्षक श्री बालाजी हुलकाने सहशिक्षक सर्वश्री रामेश्वर ब्याळे, माधव दाचावार, मकरंग वाघमारे, रामेश्वर नरोटे व कु. फरहीन या चमुने अथक परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमासाठी गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केतनभाई नागडा यांनी शुभेच्छा दिल्या.