Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

gujrati shikshan sanstha election

 

 

 

गुजराती शिक्षण संस्थेची पंचवार्षीक निवडणूक मध्ये प्रगती पॅनलचे यश, अध्यक्षपदी केतनभाई नागडा तर सचिवपदी दिपकभाई दामा यांची फेरनिवड

(नांदेड.) येथील नामांकित असलेली गुजराती शिक्षण संस्था ची पंचवार्षीक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी दिनांक 12.12.2021 रोजी गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाली. हया निवडणूकीत प्रगती पॅनल चे सर्व 21 उमेदवार हे मताधिक्याने निवडून आले. अध्यक्षपदी श्री केतनभाई नागडा तर सचिवपदी श्री दिपकभाई दामा यांची फेरनिवड आलेली आहे.
                    अत्यंत खेळीमेळीच्या वातवरणात संपन्न झालेली हया निवडणूकीत प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार हे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मताधिक्याने विजय झाले. अध्यक्षपदी श्री केतनभाई नागडा, उपाध्यक्षपदी श्री शंभूभाई मंगे व श्री चंद्रकांतभाई पटेल, सचिव पदी श्री दिपकभाई दामा, सहसचिवपदी श्री जयेशभाई सुरेशभाई ठक्कर, कोषाध्यक्षपदी श्री शांतीलालभाई पटेल, तर सदस्यपदी सर्वश्री राकेशभाई शाह, दिपेशभाई शाह, अतुलभाई लोटीया, अश्विनभाई पटेल, अॅड.जयंतीलालभाई पटेल, योगेशभाई पटेल, मुकेशभाई पटेल, जयेशभाई एच. ठक्कर, किर्तीभाई छेडा, भावेशभाई नागडा, प्रेमजीभाई गोरी, माधवजीभाई गजरा, प्रतापभाई गौरी, लक्ष्मीकांतभाई गणात्रा व राजेशभाई सुरतवाला हे मताधिक्याने निवडून आलेले आहे.
                    निवडणूक अधिकारी म्हणून सर्वश्री सुरेशभाई सांगाणी, आर.एस.सुमठाणकर, डी.डी.सापडगांवकर, पी.जी.कुलकर्णी व श्रीमती मीताबेन सोलंकी यांनी काम पाहिले तर त्यांना विजय चौव्हाण व मेहुल दावडा यांनी सहाय केले. निवडणूक अधिकारी यांनी विजयी उमेदवरांना प्रमाणपत्र देऊन विजय घोषीत केले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.