Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

SSC Result 2022

 

                    

 

                     

 

 

 

गुजराती हायस्कूल मध्ये गुणवंतांचा हृदय सत्कार

शै. वर्ष 2021-22 मध्ये शालांत परिक्षेत उल्लेखनीय यश मिळविल्या बद्दल गुजराती हायस्कूलच्या विदयार्थ्याचा सत्कार करण्यांत आला. या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. कार्यक्रमास गुजराती शिक्षण संस्थचे अध्यक्ष श्री केतनभाई नागडा सचिव श्री दिपकभाई दामा, डॉ. सविता बिरगे (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, नांदेड), श्री नागराज बनसोडे ( गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नांदेड), श्री रुस्तुम आडे (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती नांदेड) हे उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत वाद्यांच्या गजरात व एन.सी.सी. कॅडेट्सच्या सॅल्युटने करण्यांत आले. तसेच सर्व गुणवंत विदयार्थ्याचे स्वागत फटाक्यांच्या आवाजात आणि शाब्बासीयां या गीताने करण्यांत आले.

                     या निमित्ताने गुजराती हायस्कूलचे नवीन गणवेशाचे प्रगटीकरण करण्यांत आले. शाळेतील काही विदयाथ्यांनी स्वतः नवीन गणवेश परिधान करून उपस्थितांना अभिवादन केले या वर्षांच्या शाळेचा निकाल 99.43% इतका लागला आहे. तसेच विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेले 230 विदयार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले 101 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले 19 विदयार्थी तसेच तृतीय श्रेणीत 01 विदयाथी उत्तीर्ण झालेला आहे.

                  शाळेतून प्रथम तीन क्रमांक मिळविणारे विदयार्थी आहेत प्रथम कु सिध्दी बियाणी 100% द्वितीय सूरज अबादार 99.2% तृतीय: अनुष्का रुद्रावार श्रेया आळंदकर व सुमीत पाटील- 97.4% या विदयार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 90% आणि त्यापेक्षा जास्त गुण घेणारे विदयार्थी व काही विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणा-या विदयार्थ्याचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणा-यां 32 विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यांत आला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालका समवेत भव्य सत्कार करण्यांत आला. सत्काराला उत्तर देतांना विदयार्थ्यांनी कोरोना काळात सुध्दा आमचे शिक्षण शाळेने सातत्याने चालू ठेवले, असे शाळे बद्दल गौरव उदगार काढले डॉ. सविता बिरगे मॅडम, श्री बनसोडे सर संस्थेचे सचिव श्री दिपकभाई दामा सर या सर्वानी गुणवंत विदयाथ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. इंग्लिश मिडीयम मधील पहिल्या 100 विदयार्थ्यांना गुजराती शिक्षण संस्था स्वतः हून गणवेश देणार आहे असे या वेळी जाहीर केले.

                        या कार्यक्रमास गुजराती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांतभाई पटेल कोषाध्यक्ष श्री शांतीलालभाई पटेल, कार्यकारणी सदस्य सर्वश्री राजेशभाई सुरतवाला, जयंतीलालभाई पटेल, मुकेशभाई पटेल, राकेशभाई शाह, अतुलभाई लोटीया, माधवजीभाई गजरा, योगेशभाई पटेल, लक्ष्मीकांतभाई गणात्रा, किर्तीभाई छेड़ा, प्रेमजीभाई गोरी, प्रतापकुमार गोरी इत्यादि मान्यवर उपस्थित होते. गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आर एस सुमठाणकर, उपमुख्याध्यापिका सौ.एन. जे.शाह, पर्यवेक्षक श्री एस. के नायक, गुजराती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दुर्गादास सापडगांवकर, भानुमती वर्मा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्तीबेन पटेल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. व्ही. पी. अंबाडे, सौ व्ही व्ही थापे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पी. व्ही वैद्य केले.